बदलापूरमधील नीरजा आंबेकर प्रकरणामध्ये, मृत्यू नैसर्गिक नसून, पुर्वनियोजित कट असल्याचे उघड…

SHARE:

बदलापूर – बदलापूरमधील नीरजा आंबेकर प्रकरणामध्ये, मृत्यू नैसर्गिक नसून, पुर्वनियोजित कट असल्याचे उघड झाले आहे. बदलापूरमध्ये ३  वर्षांपूर्वी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी नीरजा आंबेकर यांचा झालेला मृत्यू नैसर्गिक नव्हता. तर ती हत्या होती, असा खुलासा आता झाला आहे.

बदलापूरमध्ये ३ वर्षांपूर्वी काँग्रेसपक्षाच्या महिला पदाधिकारी नीरजा आंबेकर यांचा मृत्यू प्रकरणामध्ये एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी नीरजा आंबेकर यांचा झालेला मृत्यू नैसर्गिक नसून ती पुर्वनियोजित कट रचला होता, अशी माहिती मिळाली आहे. एका गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपीने दिलेल्या माहितीमुळे हा बदलापुरमधील नीरजा आंबेकर यांच्या हत्येचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नीरजा यांचा पती रुपेश आंबेकर आणि त्याच्या ३  साथीदारांना देखील अटक केली आहे. हत्येनंतर नीरजा यांच्या मृत्यूचे खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या कुळगांव बदलापूर सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांचीही आता चौकशी केली जाणार आहे.

काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये एका तरुणावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यातील मुख्य आरोपी ऋषिकेश चाळके याला पोलिसांनी अटक केली होती. पोलीस उपनिरीक्षक राजेश गजल हे या प्रकरणाचा तपास करत असताना, चौकशीदरम्यान त्यांनी ऋषिकेशला ’तू आणखी काय-काय केले आहेस?’ असा प्रश्न विचारला. तेव्हा ऋषिकेशने बोलता बोलता ३  वर्षांपूर्वीच्या एका हत्येचा खुलासा केला आहे, त्यावेळी पोलीस हे ऐकुन चक्रावले आहेत.

बदलापुरमधील काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी, नीरजा आंबेकर यांचा हत्येचा कट व्यावसायिक रुपेश आंबेकर ने रचला होत असे आता उघडकीस आले आहे. पोलिस चौकशीदरम्यान ऋषिकेशने सांगितले की, ३ वर्षांपूर्वी म्हणजे २०२२  मध्ये काँग्रेसच्या महिला पदाधिकारी नीरजा आंबेकर यांचा जो मृत्यू झाला, तो आकस्मिक नसून त्यांची हत्या करण्यात आली होती. हत्येचा कट नीरजा यांचा पती आणि व्यावसायिक रुपेश आंबेकर याने रचला होता. त्यावेळी पोलिसांनी या मृत्यूची एडीआर दाखल केली होती, परंतु तपासात कोणताही सुगावा किंवा संशयित आरोपी न मिळाल्याने हे प्रकरण तिथेच थांबले होते.
काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी नीरजा आंबेकर यांच्या हत्येमध्ये सर्पदंशाचा वापर करण्यात आला होता. ऋषिकेशने पोलिसांच्या समोर दिलेल्या कबुलीनुसार, नीरजा यांचा पती रुपेश आंबेकर याने 3 साथीदारांच्या मदतीने नीरजा आंबेकर यांची हत्या केली होती. या हत्येमध्ये सर्पदंशाचा वापर करण्यात आला होता. २०२२ मध्ये रुपेश, चेतन दुधाने, कुणाल चौधरी आणि ऋषिकेश चाळके या चौघांनी मिळून हा कट रचला होता.

हत्येच्या आधी रुपेशने घराच्या किचनमध्ये एका गोणीत साप आणून ठेवला होता. त्यानंतर हत्या करण्याच्या रात्री, नीरजा यांच्या पायाची मालिश करण्याच्या बहाणाने त्यांना हॉलमध्ये पालथे झोपवण्यात आले होते याचवेळी चेतन दुधाने सर्पमित्र याने किचनमध्ये ठेवलेला साप स्टीकच्या मदतीने बाहेर काढला आणि ऋषिकेश चाळकेच्या हातात दिला. नीरजा हॉलमध्ये झोपलेल्या असताना, ऋषिकेश चाळके याने नीरजा यांच्या डाव्या घोट्याजवळ त्या सापाकडून 3 वेळा दंश करवून घेतला होता, अशा प्रकारे एका पोलिसांच्या कोठडीत असलेल्या तरूणाकडून, बदलापुरमधील काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी नीरजा आंबेकर यांच्या हत्येचा खुलासा करण्यात आला आहे.

Leave a Comment

अधिक वाचा