अयोध्येत बुरखा घालून दागिन्यांच्या दुकाअयोध्येत बुरखा घालून दागिन्यांच्या दुकानात दरोडा टाकणारी महिला निघाली हिंदू; पोलिसांनी केली अटक

SHARE:

उत्तर प्रदेश – मुस्लिमांना बदनाम करण्यासाठी हिंदू महिला कशा प्रकारे दुकानांमध्ये दरोडे टाकत आहे, याचा प्रत्यय आणणारी एक घटना उत्तर प्रदेशातील अयोध्येत घडली. एका महिलेने बुरखा घालून एका दागिन्याच्या दुकानात दरोडा टाकला आणि दुकानदाराला पिस्तुलाचा धाक दाखवून आपल्या प्रियकरासोबत धूम ठोकली. पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा या दोघांनाही अटक केली. महिलेचे नाव पायल असे असून आणि मुलाचे नाव राहुल आहे.

ही घटना रुदौली कोतवाली परिसरातील अग्रवाल कॉम्प्लेक्समधील एका दागिन्यांच्या दुकानात घडली. दुपारी सुमारे साडेबारा वाजता बुरखा घातलेली एक महिला दुकानात आली. तिच्या खांद्यावर अडकवलेली बॅग आणि तिचा शांत स्वभाव यामुळे ती एक सामान्य ग्राहक वाटत होती. दुकानातील कोणालाही तिच्यावर संशय आला नाही. अगदी सहजपणे त्या महिलेने सोन्याचे हार आणि साखळ्या पाहण्याची मागणी केली. दुकानदार आणि कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे तिला दागिने दाखवायला सुरुवात केली.

 

दरम्यान, दुकानातील कर्मचारी विविध कामांमध्ये व्यस्त होते. कोणाचेही लक्ष काउंटरकडे नव्हते आणि हीच ती संधी होती ज्याची ती वाट पाहत होती. वातावरण शांत होताच, तिने सुमारे २५ ग्रॅम सोन्याचे दागिने पटकन आपल्या बॅगेत भरले. जेव्हा दुकानदाराने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिने कमरेतून पिस्तूल काढून थेट त्याच्यावर रोखले आणि पुढे आल्यास गोळी घालण्याची धमकी दिली. त्यानंतर ती पळून गेली आणि दुकानदारही तिच्या मागे धावला.

 

महिलेचा प्रियकर आधीच बाईक घेऊन दुकानाच्या बाहेर उभा होता. बाहेर येताच महिला लगेच प्रियकाराच्या बाईकवर बसली आणि दोघेही पसार झाले. दुकानदाराने आणि आजूबाजूच्या लोकांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण ते दोघेही पटकन नजरेआड झाले. ही संपूर्ण घटना चित्रपटासारखी होती. त्यामुळे काही काळ लोकांना विश्वासच बसत नव्हता की लूट झाली आहे.

 

ही संपूर्ण घटना दुकानात आणि आजूबाजूला लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि परिसरातील ५० हून अधिक कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासले. फुटेजच्या आधारे आरोपींना ओळखण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली. वेगाने काम करत पोलिसांनी काही तासांतच दोन्ही आरोपींचा शोध घेतला.

 

तपासानंतर समोर आलेले सत्य आणखी धक्कादायक होते. या दरोड्याची सूत्रधार बाबा बाजारची रहिवासी आणि विवाहित असलेली पायल असल्याचे निष्पन्न झाले. तिचा प्रियकर, मावई भागातील रहिवासी असलेला राहुल, हा देखील या गुन्ह्यात सामील होता. पोलिसांनी काही तासांतच त्या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून चोरलेला सोन्याचा हार आणि लॉकेट जप्त करण्यात आले. गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि बनावट पिस्तूलही जप्त करण्यात आली.

 

चौकशीदरम्यान असे उघड झाले की, पायलने आपली ओळख लपवण्यासाठी बुरखा घातला होता. सीसीटीव्ही फुटेजमधून आपला चेहरा अस्पष्ट करून पोलिसांना आपली ओळख पटवणे कठीण करणे, हा तिचा उद्देश होता. मात्र, फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी तिचा संपूर्ण कट उधळून लावला. पोलिसांच्या तपासात असेही उघड झाले की, पायल आणि राहुल यांचे प्रेमसंबंध होते. याच संबंधामुळे त्यांनी हा कट रचला. सहज मिळणाऱ्या पैशांच्या मोहाने त्यांनी दिवसाढवळ्या दरोडा टाकण्याचा निर्णय घेतला.

 

पोलिसांच्या तपासात असे उघड झाले की, पायल आणि राहुलने या संपूर्ण घटनेचे आधीच नियोजन केले होते. आपली ओळख लपवण्यासाठी राहुलने बाजारातून एक बनावट पिस्तूल आणि बुरखा विकत घेतला. पायल एकटीच दुकानात शिरली, तर राहुल काही अंतरावर आपल्या बाईकजवळ थांबला होता.

Leave a Comment

अधिक वाचा