धुळे – शिरपूर बँक घोटाळा प्रकरणात व्यवस्थापक संजय कुलकर्णीला अटक करण्यात आली आहे, 13 कोटी 75 लाखांहून अधिक रूपयांचा घोटाळा उघडकीय आला आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे असलेल्या दि शिरपूर मर्चंट को-ऑप बँकेत 13 कोटी 75 लाख 76 हजार 253 रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आले. या प्रकरणी धुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्यातील मुख्य संशयित म्हणून बँकेचे माजी व्यवस्थापक संजय कुलकर्णीला अटक केली आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर बँकेचा माजी व्यवस्थापक संजय कुलकर्णी फरार झाला होता. 25 मे 2025 रोजी शिरपूर मर्चंट बँकचे लेखापरीक्षक यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, बँकेचे एकूण 46 अधिकारी, कर्मचारी, चेअरमन आणि कर्जदार यांनी कट रचून 13 कोटी 75 लाख 76 हजार 253 रुपयांचा मोठा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या बँक घोटाळा प्रकरणात बँकेचे सभासद आणि ठेवीदार यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. गुन्हा दाखल होताच संबंधित संशयित आरोपी फरार झाले होते. या प्रकरणातील संशयित आरोपींनी अटक टाळण्यासाठी धुळे जिल्हा व सत्र न्यायालय तसेच उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले होते. मात्र दोन्ही न्यायालयांनी त्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत.
आर्थिक गुन्हे शाखेचे पथक संशयित आरोपींचा शोध घेत आहेत. या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी संजय केशवराव कुलकर्णी याला शिरपूर येथून अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी संजय केशवराव कुलकर्णी हा शिरपूर मर्चंट बँक, शिरपूर येथे व्यवस्थापक म्हणून संजय केशवराव कुलकर्णी कार्यरत होता. या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात इतर संशयित आरोपींचा शोध सुरू आहे.
धुळे जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेकडून बँक घोटाळा प्रकरणात तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईमुळे बँकेचे सभासद, ठेवीदार आणि नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या प्रकरणातील इतर संशयितांवरही कडक कारवाई होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात अधिक तपास धुळे पोलिस करत आहेत.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






