कोल्हापूर – अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर 4 जणांनी अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. कोल्हापूरमधील राधानगरी परिसरातून ही घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कोल्हापूरात खळबळ उडाली आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी महिला अत्याचार आणि महिला हिंसाचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. कोल्हापूरच्या राधानगरी परिसरात एका महाविद्यालयीन तरुणीवर 4 जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे.
आरोपींनी पीडित तरुणीचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अनेक महिने तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात राधानगरी येथील 4 तरुणांना मुरगूड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आदित्य शेटके, पवनगिरी पालकर, विक्रम पाटील, रणजीत मुधोळकर अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी सर्वात आधी आदित्य शेटके याने पीडित तरुणीचे अश्लील व्हिडीओ शूट केले. त्यानंतर त्याने पीडित मुलीला आपल्या मित्रांसोबत बोलण्यास भाग पाडले. यानंतर या 4 जणांनी मुलीवर अनेकदा जबरदस्ती करुन तिच्यावर अत्याचार केला. या 4 आरोपींनी गेल्या 10 महिन्यांमध्ये मुलीला अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केले आहेत.
आदित्य शेटके याचा राधानगरीत फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. त्यामधूनच पीडित तरुणीची ओळख झाली होती. काही काळानंतर आदित्य शेटके या तरूणाने पीडित तरुणीशी शारीरिक जवळीक करुन तिचे व्हिडीओ चित्रित करुन तिचा गैरफायदा घेतला आहे. पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरु आहे. या प्रकरणात अधिक तपास कोल्हापूर ग्रामीण पोलिस करत आहेत.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.





