पटणा – खान सर यांच्या कोचिंग सेंटरवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. शेजारील कोचिंग सेंटर चालकांनी हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. बिहार राज्यातील पाटणा येथे खान सरांच्या खान ग्लोबल स्टडीज बाहेर ज्ञान बिंदू कोचिंगशी वादातून 15 ते 20 जणांनी तोडफोड केली आहे, सुरक्षारक्षकाला मारहाण केली आहे.
बिहारची राजधानी पाटणा परिसरात हल्लेखोरांनी 8 ते 10 राउंड गोळीबार केला आहे. या घटनेने स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. खान सरांच्या कोचिंग सेंटरचीही तोडफोड करण्यात आली आहे. दोन कोचिंग सेंटरमधील व्यावसायिक वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
मात्र, या मारहाणीत सुरक्षारक्षक जखमी झाला असून त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यामागील कारण अस्पष्ट आहे. तर खान सर यांनी त्यांच्या शेजारच्या कोचिंग सेंटरच्या चालकांवर हे कृत्य घडवून आणल्याचा आरोप केला आहे. कोचिंग इन्स्टिट्यूटबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर खान सर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांचा तपास अजूनही सुरू आहे. तपास जसजसा पुढे जाईल, तसतशी आम्हाला अधिक माहिती मिळेल. आम्ही इथे कोणत्याही संघर्षासाठी सज्ज होऊन बसलेलो नाही, किंवा नक्की काय घडले आणि काय नाही, याबद्दल केवळ तर्कवितर्कही करत बसलेलो नाही.
सुरक्षा रक्षकाला या ठिकाणावरून फरफटत नेऊन दुसऱ्या एका ठिकाणी नेण्यात आले. जिथे त्याच्यावर अत्यंत क्रूरपणे हल्ला करण्यात आला आहे. या सुरक्षा रक्षकाला इतक्या गंभीर दुखापती झाल्या आहेत की, सध्या तो बोलण्याच्या किंवा कोणताही जबाब देण्याच्या स्थितीत नाही. नक्की काय घडले याबद्दल आम्हालाही अद्याप स्पष्ट कल्पना नाही. त्या रक्षकावर हल्ला का करण्यात आला, किंवा तोच हल्ल्याचे मुख्य लक्ष्य होता की नाही, हे आम्हाला अजून समजलेले नाही. कदाचित अन्य कोणाला तरी टार्गेट केले जात असावे आणि तो सुरक्षा रक्षक मध्ये आला असावा, अशी शक्यता नाकारता येत नाही.
मात्र, एक गोष्ट निश्चित आहे की, अत्यंत क्रूरपणे हल्ला करण्यात आला आहे. अगदी गरीब कुटुंबातील मुलांनाही शिक्षण देणे आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचेल याची खात्री करणे, यावरच आमचे मुख्य लक्ष केंद्रित आहे. प्रशासनावर आमचा पूर्ण विश्वास आहे. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आणि जिल्हा प्रशासन व आणि शेजारील पोलीस ठाण्यांमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. खान सर यांनी म्हटले आहे की, हल्लेखोरांनी केवळ गोळीबारच केला नाही, तर कोचिंग सेंटरबाहेर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकावर जीवघेणा हल्ला चढवला.
त्याला इतकी बेदम मारहाण करण्यात आली की, तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पाटणाचे एसएसपी कार्तिकेय शर्मा आणि एसपी यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. या घटनेतील आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई होईल, असे आश्वासन एसएसपींनी दिले आहे. विद्यार्थ्यांनी कोचिंग सेंटरबाहेर जोरदार घोषणाबाजी सुरू केली, ज्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि लांबच लांब ट्रॅफिक जाम लागला.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून स्वतः खान सर कोचिंग सेंटरच्या बाल्कनीमध्ये आले. त्यांनी हात जोडून विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आणि आपापल्या घरी परतण्याचे आवाहन केले. मात्र, जोपर्यंत प्रशासनाकडून सुरक्षेचे ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली. पोलीस अधिक्षक कार्यालयाने पाटणा यांनी जारी केलेल्या माहितीनुसार, सोमवार, २ जून 2026 रोजी रात्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खान ग्लोबल स्टडीजबाहेर काही जणांनी तोडफोड केली. 15 ते 20 जणांनी धुमाकूळ घातला आहे.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आहेत. आणि स्थानिक लोकांची चौकशी केली आहे. यामध्ये ज्ञान बिंदू कोचिंग इन्स्टिट्यूटशी संबंधित 15 ते 20 तरुणांनी खान सरांच्या ऑफिसवर दगडफेक आणि तोडफोड केल्याचे स्पष्ट दिसले आहे. गोळीबाराचे पुरावे नाहीत. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, आतापर्यंतच्या तपासात आणि फुटेजमध्ये कुठेही शस्त्र चमकताना किंवा गोळीबार होताना दिसलेला नाही. हा प्रकार दोन संस्थांमधील हिंसक हाणामारीचा आहे. या प्रकरणात अधिक तपास पाटणा पोलिस करत आहेत.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






