जिल्हास्तरीय ‘जागतिक लोकसंख्या दिन’ उत्साहात साजरा; तरुण पिढीने छोटे व सुदृढ कुटुंब अंगीकारावे : अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके

SHARE:

गडचिरोली :- सार्वजनिक आरोग्य विभाग, गडचिरोलीच्या समन्वयाने तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी मा. डॉ. प्रताप शिंदे व जिल्हा शल्य चिकित्सक मा. डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनानुसार दिनांक ११ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता ‘जागतिक लोकसंख्या दिन’ जिल्हास्तरीय उद्घाटन व शुभारंभ सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली, त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. या सोहळ्याचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक मा. डॉ. छाया उईके यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधीक्षक मा. डॉ. माधुरी किलनाके, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी मा. डॉ. माधव शिंदे, क्ष-किरण तज्ज्ञ डॉ. नीलकंठ मसराम, बालरोगतज्ज्ञ (वर्ग-१) डॉ. प्रशांत पेंदाम आणि सहाय्यक अधिसेविका श्रीमती कविता पोतरोजवार प्रामुख्याने उपस्थित होत्या.

रांगोळीतून लोकसंख्या वाढीच्या दुष्परिणामांवर प्रकाश
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे नर्सिंग प्रशिक्षणार्थींनी काढलेली उत्कृष्ट रांगोळी ठरली. नर्सिंग प्रशिक्षणार्थींनी आपल्या कलागुणांचा वापर करून रांगोळीच्या माध्यमातून वाढत्या लोकसंख्येचे विदारक चित्र आणि त्याचे दुष्परिणाम अतिशय प्रभावीपणे रेखाटले. या कलाकृतीचे उपस्थितांनी व मान्यवरांनी कौतुक केले.

(स्रोत – जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली.)

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment

अधिक वाचा