आसाममध्ये घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शारीरिक व मानसिक अत्याचार केल्याचा प्रकार उघड

SHARE:

आसाम – घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शारीरिक व मानसिक अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. गुवाहाटीत घरकाम करणार्या अल्पवयीन मुलीवर शारीरिक व मानसिक अत्याचाराची घटना घडली आहे. तर या प्रकरणाचा एक व्हिडीओ सोशल माडियावर व्हायरल झाल्यामूळे गुवाहाटीमधील स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे.

देशभरात मुलींवरच्या अत्याचाराच्या घटना सुरूच आहेत. देशात अल्पवयीन मूलींवरील अन्याय, अत्याचाराच्या घटना ही दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. देशभरात अल्पवयीन मूली, महिला यांच्या असुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशात रोज कुठे महिलांवर अन्यायाच्या घटना घडत आहेत. यामूळे महिला सुरक्षा हा विषय देशात गंभीर बनला आहे. भारतात घरकाम, अत्याचार, बलात्कार, असमान वागणूक हे सगळे सहन करूनही आजची स्त्री या जगात भक्कमपणे आपले स्थान निर्माण करताना आपल्याला दिसत आहे. आसाममधील गुवाहाटीच्या पंजवारी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सगळीकडे सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच सगळीकडे गुवाहाटीमध्ये खळबळ उडाली आहे.

आसामच्या गुवाहाटी येथील पंजाबारी येथील जुरीपारमध्ये ही अत्याचाराची घटना घडली आहे. गुवाहाटीत एक अल्पवयीन मुलगी अमरीन अख्तर लस्कर नावाच्या महिलेच्या घरी गेल्या ६  वर्षांपासून घरकाम करत होती. त्यानंतर त्या अल्पवयीन मूलीवर सतत शारिरिक ,मानसिक अत्याचार होत होते, तसेच तिला मारहाण केली जात होती. हे प्रकरण सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यामूळे चर्चेत आले आहे. अशा प्रकारे अल्पवयीन मूलीवर अन्याय, अत्याचार होत असलेला हे गुवाहाटीतील प्रकरण समोर आले आहे.

स्थानिक लोकांना संशयास्पद गोष्टी दिसल्याने त्यांनी जिल्हा श्रम फोर्सकडे तक्रार केली, आणि या तक्रारीनुसार जिल्हा श्रम अधिकाऱ्यांनाही घरात संशयास्पद हालचाली दिसून आल्या. जिल्हा श्रम फोर्स घरात पोहोचताच महिलेने मुलगी घरात नाही. मुलीचे वडील मुलीला घेऊन गेले अशी खोटी माहिती अधिकाऱ्यांना दिली. परंतु अधिकाऱ्यांनी घरात घुसून शोध घेतल्यावर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरातील बेडमध्ये अल्पवयीन मुलीला कोंडून ठेवले होते. या प्रकरणात मुलीने स्पष्टीकरण दिले आहे.

अधिकाऱ्यांनी मुलीला बाहेर काढले. बाहेर आल्यावर मुलगी बेशुद्ध पडली. शुद्धीवर येताच अल्पवयीन मूलगी जोरजोरात रडू लागली, प्राथमिक तपास केल्यावर अल्पवयीन मुलीने सांगितले की, तिला खूप काळापासून मारहाण आणि अत्याचार सहन करावे लागत होते. त्यांनतर तिला त्वरित सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. पुढील चौकशी सुरु आहे. या अन्याय करणार्या कुटुंबावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी गुवाहाटी येथील स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे. याप्रकरणात अधिक तपास गुवाहाटी पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा