सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून निवृत्त आरबीआय कर्मचाऱ्याची सायबर फसवणूक; अटक होणार असल्याचे सांगून उकळले पैसे

SHARE:

मुंबई – अंधेरीमध्ये सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून निवृत्त आरबीआय कर्मचाऱ्याची सायबर फसवणूक करण्यात आली आहे. मी सीबीआयचा अधिकारी बोलतोय, तुम्हाला अटक होणार आहे, असे सांगून एका अज्ञात व्यक्तीने निवृत्त आरबीआय कर्मचार्याची ऑनलाईन फसवणुक केली आहे. तर मुंबईत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अंधेरी पूर्व परिसरातील निवृत्त आरबीआय कर्मचाऱ्याला १ लाख १० हजार रुपयांना फसवले आहे. मुंबईतील अंधेरी परिसरात स्वतःला अधिकारी असल्याचे सांगत एका निवृत्त कर्मचाऱ्याची सायबर फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.

आरोपीने अटक करण्याची धमकी देत भीती निर्माण केली होती. आणि ऑनलाईन व्यवहारांद्वारे १ लाख १०  हजार रुपये घेतलेले आहे. माहितीनुसार, १ मार्च २०२६ रोजी तक्रारदाराला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला केंद्रीय अन्वेषण विभागामधील अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर तक्रारदाराविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल असल्याचे सांगत अटक होऊ शकते, अशी धमकी देण्यात आली होती. या धमकीमुळे घाबरलेल्या तक्रारदारावर आरोपीने पैसे पाठवण्याचा दबाव टाकला आहे.

भीतीपोटी तक्रारदारांनी सुरुवातीला २० हजार रुपये ऑनलाईन पाठवले. यानंतर 4 मार्च रोजी आरोपीने पुन्हा फोन करून आणखी पैसे मागितले आहेत. १  मार्च ते ४ मार्च या काळात आरोपीच्या सांगण्यावरून तक्रारदारांनी ६ वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे एकूण १  लाख १० हजार रुपये पाठवले आहेत. आरोपीने आणखी १ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली होती. पैसे उपलब्ध नसल्याचे सांगत तक्रारदारानी त्यानंतर फोन उचलणे बंद केले होते. हा प्रकार त्यांनी आपल्या मुलाला सांगितल्यानंतर संपूर्ण घटना सायबर फसवणुकीची असल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यानंतर तक्रारदारांनी अंधेरी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे. या सायबर फसवणुक प्रकरणात पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या धमकीच्या फोन कॉल्सना घाबरून कोणालाही पैसे पाठवू नयेत, तसेच अशा घटना घडल्यास त्वरित पोलीस हेल्पलाईनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे. याप्रकरणात अधिक तपास मुंबई पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा

नागपुरात एका NGO मध्ये हैराण करणारी घटना समोर आली आहे, ज्यात एका व्यक्तीने महिलेच्या कपाळावर किस करण्याचा प्रयत्न केला आणि तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पोलीस देखील चक्रावले आहेत!