रुपाली चाकणकरांसह शिवनिका संस्थेच्या सर्व आजी-माजी सदस्यांची एसआयटी चौकशी होणार; भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अनेक नावे पोलिसांच्या रडारवर

SHARE:

नाशिक – भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांसह शिवनिका संस्थेच्या सर्व आजी-माजी सदस्यांची एसआयटी चौकशी होणार आहे. नाशिक पोलिसांच्या रडावर अनेक जणांची नावे आली आहेत. एसआयटी सर्व आजी माजी सदस्यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याची माहिती मिळाली आहे. रूपाली चाकणकर यांची देखील एसआयटी कडून आता चौकशी होणार आहे. भोंदूबाबा अशोक खरात याच्या अघोरी कृत्यांचा आणि आर्थिक व्यवहारांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने आता भोंदूबाबा अशोक खरातशी संबंधित सर्व खाजगी संस्थांकडे चौकशी करणार आहे.

भोंदूबाबा अशोक खरातच्या शिवनिकासंस्थेचे सर्व व्यवहार आता एसआयटीच्या नजरेसमोर आले आहेत. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही चौकशीसाठी समन्स बजावल्याची माहिती मिळाली आहे. शिवनिका संस्थेच्या सर्व आजी-माजी सदस्यांची ही एसआयटी चौकशी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. एसआयटी सर्व आजी माजी सदस्यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याची माहिती मिळाली आहे, रूपाली चाकणकर यांची देखील एसआयटी कडून आता चौकशी होणार आहे. शिवनिका संस्थेचे सर्व सदस्य चौकशीच्या फेर्यात येणार आहेत.

माहितीनुसार, भोंदू अशोक खरातने स्थापन केलेल्या शिवनिका संस्थेच्या माध्यमातून अनेक मोठे आर्थिक व्यवहार आणि मोठे कार्यक्रम पार पडले होते. या संस्थेवर विविध वेळी कार्यरत असलेल्या सर्व आजी-माजी सदस्यांची आता एसआयटीकडून चौकशी होणार आहे. या सर्व आजी-माजी सदस्यांना लवकरच चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. संस्थेच्या निधीचा वापर आणि भोंदू अशोक खरातला मिळालेले पाठबळ यावर नाशिक पोलीसंनी लक्ष केंद्रित करत केले आहे. आता राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ आणखीनच वाढ होणार आहे.

भोंदू अशोक खरात प्रकरणावरून आर्थिक व्यावहारिक संबंधांच्या पार्श्वभूमीवर, एसआयटी आता रूपाली चाकणकर यांचीही चौकशी करणार आहे. माहितीनुसार, त्यांना चौकशीला उपस्थित राहण्याबाबतचे समन्स पाठवण्यात आले आहे, या एसआयटी चौकशीमध्ये रूपाली चाकणकर यांचे जबाब नोंदवले जाऊ शकतात. आणि या प्रकरणात आर्थिक व्यवहार आणि कागदपत्रांची तपासणी होणार आहे. एसआयटीने शिवनिका संस्थेचे बँक खात्यांचे तपशील आणि मागील काही वर्षांतील व्यवहारांची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. या संस्थेच्या नावाखाली नेमका कोणता पैसा कुठे वळवण्यात आला आणि यामध्ये कोणत्या बड्या व्यक्तींचा सहभाग होता, याची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

भोंदू अशोक खरातला अटक झाल्यानंतर रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. आता या शिवनिका संस्थेच्या चौकशीमुळे अनेक मोठे राजकीय चेहरे समोर येण्याची शक्यता आहे. तर कॅप्टन अशोककुमार एकनाथ खरात, डॉ. जितेंद्र गणपतराव शेळके, सौ. कल्पना अशोककुमार खरात, ना. सौ. रूपाली निलेश चाकणकर, श्री. सुभाषराव केशवराव जमे, श्री. ललित प्रकाश गोफणे, डॉ. नंदकिशोर तुकाराम काटोरे ही शिवनिका या संस्थेच्या विश्वस्त मंडळातील नावे आहेत. तर या सर्व सदस्यांची एसआयटी चौकशी होणार आहे, असे नाशिकच्या एसआयटी पथकाने म्हटले आहे. या प्रकरणात अधिक तपास नाशिक पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा