सोलापूर – घराच्या परिसरात गांजाची लागवड करण्यात आल्याचा प्रकार उघड करण्यात आला आहे, तर या प्रकरणात ४ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोलापूर शहरात घराच्या परिसरात गांजाची लागवड केल्याप्रकरणात सोलापूर गुन्हे शाखेकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. सोलापुर गुन्हे शाखेकडून २१ किलो गांजासह आरोपीला अटक करण्यात आली आहे. सोलापूर शहरात खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
राज्यात ग्रामीण भागात किंवा दुर्गम भागातील शेतात गांजाची बेकायदेशीर लागवड केली जाते, मात्र सोलापूर शहरात एका राहत्या घराच्या परिसरात गांजाची लागवड करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणात सोलापूर शहर गुन्हे शाखेने कडक कारवाई केली आहे. मोठ्या प्रमाणात गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणात सोलापूरमधुन एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सोलापूर शहर गुन्हे शाखेला शहरातील एका भागात राहत्या घराच्या परिसरात आणि घरासमोरील मोकळ्या जागेत अमली पदार्थांची झाडे लावल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे सोलापूर पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकली आहे. यावेळी सोलापूर पोलिसांना घराच्या परिसरात लावलेली गांजाची ५९ हिरवीगार झाडे सापडली आहेत. ही गांजाची झाडे पाहून सोलापूरचे पोलीस अधिकारीही चक्रावून गेले आहेत. या कडक कारवाईत सोलापूर पोलिसांनी २१ किलो ४३९ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या या गांजाची सध्याच्या बाजारपेठेतील किंमत ४ लाख ३९ हजार रुपये इतकी असल्याची माहिती मिळाली आहे.
सोलापूर पोलिसांनी ही सर्व गांजाची झाडे उपटून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून रजाक गफुर शेख या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची गुन्ह्याचा प्रकार लक्षात घेऊन ४ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. या घटनेने सोलापूर शहरात खळबळ उडाली आहे. सोलापूर शहराच्या मध्यवस्तीत किंवा लोकवस्ती असलेल्या भागात अशा प्रकारे गांजाची लागवड झाल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
या घटनेने सोलापूर शहर परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. हा गांजा केवळ स्वतःसाठी लावला होता की, याची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात होती, याचा तपास आता सोलापूर गुन्हे शाखा करत आहे. सोलापूर पोलिसांच्या या कडक कारवाईनंतर शहरातील अमली पदार्थ विक्रेत्यांवर पोलिसांची छुपी नजर राहणार आहे. या प्रकरणात अधिक तपास सोलापूर पोलिस करत आहेत.





