पुणे – नांदेड सिटी पब्लिक स्कूलमधील लिपिकाने ३७ लाखाचा भ्रष्टाचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. पुण्यातील नांदेड सिटी पब्लिक स्कूलच्या कर्मचाऱ्याने लाखो रूपयांची फसवणुक केल्याची घटना आता समोर आली आहे. ६ महिने मोठी आर्थिक फसवणुक करून पत्नीच्या अकाऊंट मध्ये पैसे भरले आहेत. पुण्यातील नांदेड सिटी पब्लिक स्कूलमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या नांदेड सिटी पब्लिक स्कूल शाळेतील एका लिपिकाने आपल्या पदाचा गैरवापर करून मोठी आर्थिक फसवणुक केल्याची माहिती मिळाली आहे.
नांदेड सिटी पब्लिक स्कूलच्या कर्मचाऱ्यानेच संस्थेची मोठी फसवणुक केली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील विद्या प्रतिष्ठान या संस्थेच्या नांदेड सिटी पब्लिक स्कूलमधून ही घटना समोर आली आहे. शाळेतील एका लिपिकाने आपल्या पदाचा गैरवापर करून त्याने इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून नांदेड सिटी पब्लिक स्कूल या शाळेचे ३७ लाख रुपये परस्पर आपल्या पत्नीच्या बँक खात्यात भरल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्र अनपट हा नांदेड सिटी पब्लिक स्कूल या शाळेत क्लार्क म्हणून कार्यरत होता.
आरोपी राजेंद्र अनपटने ५ नोव्हेंबर २०२४ ते ३ जून २०२५ या ६ महिन्यांच्या कालावधीत संस्थेची मोठी आर्थिक लुट केली आहे. संस्थेच्या संमतीशिवाय त्याने इंटरनेट बँकिंगचा वापर करून टप्प्याटप्प्याने ३६ लाख ९९ हजार ९८८ रुपये आपली पत्नी अश्विनी अनपट/अश्विनी तरटे हिच्या बँक खात्यावर पाठवले आहेत. संस्थेचा हा आर्थिक फसवणुक घोटाळा कोणाच्या लक्षात येऊ नये यासाठी राजेंद्र अनपटने नांदेड सिटी पब्लिक स्कूल या शाळेच्या अधिकृत रेकॉर्डमध्ये फेरफार करून खोटी नोंद केली होती. मात्र, संस्थेच्या वार्षिक लेखा परीक्षणात म्हणजेच ऑडिटमध्ये हा ३७ लाखांचा हिशोब जुळला नाही.
नांदेड सिटी पब्लिक स्कूल या शाळेमार्फत राजेंद्र अनपटची चौकशी केल्यानंतर क्लार्क राजेंद्र अनपटनेच हा मोठा आर्थिक घोटाळा केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात नांदेड सिटी पब्लिक स्कूल या शाळेच्या प्राचार्या वंदना सचिन जोशी यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुण्यातील नांदेड सिटी पोलीसांकडून राजेंद्र अनपट आणि अश्विनी अनपट या दोघांविरोधात संस्थेची मोठी आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्र अनपटला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अधिक तपास पुणे पोलिस करत आहे.





