नाशिक – महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात तपास सुरू असलेल्या टीसीएस आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नाशिकमधील लैंगिक अत्याचार प्रकरणी टीसीएस या आयटी कंपनीकडून मोठी कडक कारवाई करण्यात आली आहे. टीसीएस या आयटी कंपनीतील सर्व संशयित कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून बाहेर काढले आहे. नाशिकमधील टीसीएस या आयटी कंपनीच्या युनिटमध्ये लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल झाले आहेत. या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
भारताची सर्वात मोठी आयटी सेवा निर्यात करणारी कंपनी टाटा कंन्सल्टंन्सी सर्व्हिसेस या कंपनीच्या नाशिक येथील युनिटमध्ये लैंगिक छळाच्या घटनांबाबत दाखल झालेल्या ९ एफआयआरमुळे ही कंपनी चर्चेत आली. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना टाटा कंन्सल्टंन्सी सर्व्हिसेस या आयटी कंपनीने कोणत्याही प्रकारच्या छळ किंवा जबरदस्तीबाबत आमचे धोरण नसल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणात तपास सुरू असलेल्या टीसीएस या आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आतापर्यंत लैंगिक अत्याचार प्रकरणात ६ जणांना अटक करण्यात आली आहे.
१२ एप्रिल २०२६ रोजी टीसीएस आयटी कंपनीच्या प्रवक्तयाने सांगितले आहे की, नाशिकमधील टीसीएस आयटी कंपनीच्या युनिटमधील या अत्याचार प्रकरणाची माहिती मिळताच आम्ही टीसीएस कंपनीच्या कर्मचार्यांवर कडक कारवाई केली आहे. या घटनेत तपास सुरू असलेल्या टीसीएस आयटी कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. आम्ही स्थानिक नाशिक पोलिस प्रशासनासोबत पूर्ण सहकार्य करत आहोत. आणि पुढील कडक कारवाई पोलिस तपासात होईल, असे टीसीएस आयटी कंपनीच्या प्रवक्तयाने म्हटले आहे.
टीसीएस आयटी कंपनीच्या प्रवक्तयाने कंपनीने पुढे म्हटले की, टीसीएसमध्ये कोणत्याही प्रकारच्या छळ किंवा दबावाल मान्यता नाही. आम्ही नेहमीच टीसीएस आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला आणि त्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. नाशिक पोलिस सध्या टीसीएस आयटी कंपनीच्या एका एचआर अधिकाऱ्याची चौकशी करत आहेत. हा अधिकारी पुण्यात टीसीएस आयटी कंपनीत कार्यरत आहे. तक्रारदार महिलांनी पूर्वी तक्रार करूनही योग्य कारवाई केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नाशिक पोलिसांच्या माहितीनुसार काही पीडित महिलांनी यापूर्वी टीसीएस आयटी कंपनीच्या एचआर व्यवस्थापकाकडे तक्रार केली होती. मात्र त्यावर कोणतीही कडक कारवाई करण्यात आली नाही. नाशिक पोलिसांनी संबंधित टीसीएस आयटी कंपनीच्या अधिकाऱ्याला पुढील चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. हे प्रकरण मार्च महिन्यात समोर आले आहे. जेव्हा एका महिलेने टीसीएस आयटी कंपनीतील एका सहकाऱ्याने लग्नाचे आश्वासन देत शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतरच्या तपासात आणखी ८ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.
ज्यात लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आतापर्यंत टीसीएस आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या 6 जणांना अटक करण्यात आली आहे. नाशिक पोलिस आयुक्तालयाला मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कडक कारवाई करण्यात आली आहे. या लैंगिक अत्याचार प्रकरणात आतापर्यंत ८ महिला आणि एका पुरुषाने तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार संबंधित आरोपींकडून या प्रकरणांमध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात अधिक तपास नाशिक पोलिस करत आहेत.





