अन्न व औषध प्रशासनाचा दणका: बनावट दूध केंद्रावर धाड, २६६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट!

SHARE:

जळगाव – बनावट दूध निर्मिती केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे, तर 266 लिटर भेसळयुक्त दुधाचा साठा नष्ट केला आहे. जळगावातील अन्न व औषध प्रशासनाने भवरखेड येथील बनावट दूध निर्मिती केंद्रावर कारवाई केली आहे. या प्रकरणात 266 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट केले आहे. जळगाव कार्यालयास प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे 27 मे 2026 रोजी धरणगाव येथे बनावट दूध निर्मिती करणाऱ्या व्यक्तीवर एसीबी कडून कडक कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात सोमनाथ आनंदा माळी यास अटक केली आहे.

खाद्य तेलाचा वापर करून बनावट दूध तयार करताना अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सोमनाथ आनंदा माळी यास पकडले आहे. तपासणीत रिफाइन्ड पामोलीन तेलाचा वापर दुधातील फॅट वाढविण्यासाठी करण्यात येत असल्याचे उघडकीस आलेआहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईत दोन गाईच्या दुधाचे तसेच एक खाद्यतेलाचा नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आला. तसेच 266 लिटर भेसळयुक्त दुधाचा साठा भवरखेडचे पोलीस पाटील, रेखा नंदकिशोर पाटील व ग्रामस्थांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आला आहे.

या कारवाईत आरोपी सोमनाथ आनंदा माळी याने लघुशंकेसाठी जात असल्याचे कारण देत घटनास्थळावरून पळ काढला आहे. त्याच्याविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 207/2026 अन्वये 28 मे 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही या आरोपीवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे. संबंधित आरोपी विरुद्ध यापूर्वीही दुधात भेसळ केल्याप्रकरणी पोलिस व अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई केली होती.

त्या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात प्रथम अहवाल दि. 29 जुलै 2025 रोजी देण्यात करण्यात आला होता. त्यामुळे संबंधित आरोपी वारंवार अशा प्रकारचे गुन्हे करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन नाशिक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. परिसरात कुठेही बनावट दूध अथवा अन्न भेसळीचे प्रकार आढळल्यास नागरिकांनी संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment

अधिक वाचा