​”विकासाची चर्चा नाही, केवळ हेराफेरी”; भाजप आमदार श्याम प्रकाश यांच्या विधानाने खळबळ

SHARE:

उत्तर प्रदेश – गेल्या दशकात अनेक राज्यामध्ये निवडणूका झाल्यात. मात्र आपण पाहिले असेल कि या निवणुकामंध्ये विकासाचा मुद्याच गायब होता. निवडणुकांमध्ये भ्रष्टाचार, महांगाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा असे मुद्दे दिसून आले नाहीत. मग निवडून येणाऱ्या पक्षांना मत देतात तरी कोण? असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. यावरून आता उत्तर प्रदेशातील भाजपचे आमदार श्याम प्रकाश यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी दावा केला कि निवडणुका विकासाने नव्हे, तर हेराफेरीने जिंकल्या जातात. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ समाज माध्यमांत वेगाने व्हायरल होत आहे.

हरदोइ जिल्ह्यातील तरियावान ब्लाॅकमधील ग्रामप्रमुखांच्या कार्यकाळाला सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाल्यानिमित्त शनिवारी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात हरदोई जिल्ह्यातील गोपमऊ विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार श्याम प्रकाश यांनी निवडणुका आणि राजकारणावर स्पष्ट भाष्य केले. या कार्यक्रमात ग्रामप्रमुखांना संबोधित करताना आमदार म्हणाले, निवडणुका केवळ विकासकामांच्या आधारावर जिंकल्या जात नाहीत. राजकीय हेराफेरी आणि रणनीती देखील महत्त्वाची भूमिका बजावतात.

भाजप आमदार श्याम प्रकाश म्हणाले कि आम्हीही बरीच विकासकामे केली. सार्वजनिक सुविधांवर पैसा खर्च केला. गावांमध्ये रस्ते बांधले, परंतू मते मिळाली नाहीत. निवडणुका विकासाने नव्हे, तर हेराफेरीने जिंकल्या जातात. आमदार प्रकाश यांनी गावप्रमुखांना आगामी पंचायत निवडणुकांची तयारी करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, तुम्ही शक्य ते सर्व डावपेच वापरा. साम, दाम, दंड भेद सर्वच वापरा.तुम्हाला पुढची निवडणूक जिंकायचीच आहे.

भाजप आमदाराच्या या वक्तव्यावरून समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी एक्सवर एका पोस्टमध्ये लिहिले कि भाजप जेवढा जास्त अप्रामाणिक आहे, तेवढाच त्यांचा मंच उंच आहे. भाजप अप्रामाणिकपणाने निवडणुका जिंकतो हे मान्य करून, भाजप आमदाराने भ्रष्ट भाजप राजकारणाचा एनकाउंटर केला आहे. आणि त्यावर बुलडोझरही चालवला आहे. आता पाहूया, या भाजप आमदाराला पक्षातून काढून टाकले जाते की भाजप त्याला पुढचा मुख्यमंत्री म्हणून घोषित करते. यावेळी जनता भाजपचे सर्व डावपेच हाणन पाडेल. भाजपचा पराभव होईल आणि ते कधीही परत येणार नाहीत.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

मुख्य संपादक सा. रयत रक्षक, महाराष्ट्र. रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र.

Leave a Comment