कॅन्सर हॉस्पिटलचा डेटा लॉक करून हॅकर्सने 75 लाखांची खंडणी मागितल्याची घटना; आरोपींवर सायबर गुन्हा दाखल

SHARE:

चंद्रपुर – कॅन्सर हॉस्पिटलचा डेटा लॉक करून हॅकर्सने 75 लाखांची खंडणी मागितल्याची घटना घडली आहे, तर पोलिसांकडून आरोपींवर सायबर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपुरात कॅन्सर हॉस्पिटलवर सायबर हल्ला करण्यात आला आहे. तर या प्रकरणात हॉस्पिटलचा डेटा लॉक करून हॉस्पिटल प्रशासनाकडे खंडणी मागण्यात आली आहे. चंद्रपुर शहरात डिजिटलच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक, डिजिटल अरेस्ट आणि डेटा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

त्यामुळे, चंद्रपूर जिल्ह्यातील खाजगी संस्थांना सर्व्हरमधील माहिती सुरक्षित ठेवण्याचे आव्हान पोलिसांनी केले आहे. तरी हॅकर्सकडून सायबर हल्ले करुन एखाद्या खाजगी संस्थेचा सर्व्हर हॅक केल्या जात असल्याचे प्रकरणे समोर येत आहेत. चंद्रपूरमध्ये एका कॅन्सर हॉस्पिटलच्या सर्व्हरवर सायबर हल्ला केल्याची घटना उघड झाली आहे. हॅकर्सने 75 लाख रुपयांची खंडणी रुग्णालय प्रशासनाला मागितली आहे. चंद्रपूर शहरातील कॅन्सर हॉस्पिटलच्या मुख्य सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

हॅकर्सने रुग्णालयाचा महत्त्वाचा डेटा लॉक करून खंडणी मागितल्याने हॉस्पिटल प्रशासनात खळबळ उडाली आहे. चंद्रपूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार 1 जून 2026 रोजी सकाळी सर्व्हरमध्ये बिघाड झाला. तपासणीत सर्व्हरवर धमकीचा संदेश दिसला आहे. त्यावेळी, अज्ञात हॅकर्सनी रुग्णालयाची डिजिटल यंत्रणा ताब्यात घेतल्याचे कळाले आहे. या सायबर हल्ल्यामुळे हॉस्पिटल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम ठप्प झाली आहे. रुग्णांचा वैद्यकीय इतिहास, उपचारांची माहिती आणि प्रशासनाशी संबंधित कामकाजावर परिणाम झाला आहे.

हॅकर्सनी खंडणीची रक्कम भरल्यानंतरच डेटा अनलॉक करण्याची की देण्यात येईल अन्यथा डेटा कायमचा नष्ट होणार आहे अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं हॉस्पिटलसारख्या खाजगी संस्थांनाही सायबर विभगाची, डेटाची सुरक्षितता बाळगणे किती गरजेचे आहे, हे कळाले आहे. या प्रकरणात अधिक तपास चंद्रपूर पोलिस करत आहेत.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment