पुणे – सोशल मीडियावर अश्लील फोटो व्हायरल करून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली आहे. 2 अल्पवयीन मुलासह कॅफे मालकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात पुण्यातील तळेगाव दाभाडे परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राज्यात महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. पुण्यातील तळेगाव दाभाडे परिसरातून संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.
एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच मित्रानी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. या गंभीर प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. 2 अल्पवयीन मुलासह एका कॅफे मालकाला अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी तिच्या आईसोबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली होती. पीडित अल्पवयीन मुलीच्या मित्रांनी तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची प्राथमिक तक्रार तिने नोंदवली होती.
पोलिसांनी जेव्हा पीडित अल्पवयीन मुलीकडे चौकशी केली, तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले आहे. काही दिवसांपूर्वी तिच्याच ओळखीच्या मुलाने तिला तळेगावमधील कोजी कॅफे येथे नेले होते. या कॅफेमध्ये त्या मुलाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या कॅफेमध्ये अशा प्रकारचे अनैतिक आणि बेकायदेशीर कृत्य सुरू असल्याची माहिती पोलीस तपासात समोर झाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तळेगाव दाभाडे पोलिसांनी कोजी कॅफेचा मालक शिंदे याला अटक केली आहे.
तसेच पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी सांगितले आहे की, पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून 2 अल्पवयीन मुलांसह कॅफे मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळेगाव दाभाडे या भागात एका कॅफेमध्ये असा प्रकार घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात अशा कॅफे संस्कृतीवर आणि बेकायदेशीर कृत्यांवर पोलिसांनी नियंत्रण ठेवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






